घटना दुरुस्ती हे शब्द भारतीय संविधानाची बदनामी करणारे – दादासाहेब शेळके(राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

90

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 16 फेब्रुवारी):- भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशात अमलात आले.त्याच्या पासून दुसऱ्याच वर्षी पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये झाली होती.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यात असे पर्यंत जवळपास 7 घटना दुरुस्त्या झाल्या आहेत.तर आज पर्यंत 105 घटना दुरुस्ती झाल्या आहेत.

2021 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बदलत्या काळाची पावले ओळखून व परिस्थितीला अनुसरून संविधानात दुरुस्ती नाहीतर फेरफार करण्याची तरतूद The Indian Constitution of India part 20 Amendment of the constitution Article 368 भारतीय संविधान भाग 20 अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कलम 368 मध्ये संविधानाची फेरफार (सुधारणा, दुरुस्ती) ही तरतूद केलेली आहे.

मुळातच आपले संविधान फार लवचिक ही नाही आणि कठोर ही संविधान निर्मात्याने ठेवलेले नाही. मुळातच घटना म्हणजे संविधान व दुरुस्ती या शब्दाचा अर्थ मोडतोड व पडझड झालेल्या गोष्टी योग्य, बरोबर, नीट करणे अर्थात डागडुजी करणे असा होतो. ज्या बाबीची बिघाड झालेली आहे.अशाच बाबीची दुरुस्ती केल्या जाते मग संविधानात कोण्या बाबीची बिघाड झालेली आहे का ? तर त्याचे उत्तर अजिबात नाही असे आहे.

उलट आपले संविधान जगातले सर्वात चांगले संविधान आहे. तसेच दुरुस्ती हा शब्द संविधानाला अभिप्रेत नाही. कारण घटना दुरुस्ती करायला संविधानाची मोडतोड झाली आहे का तर अजिबात नाही.

पण संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहीत असताना बदलता काळ,परीस्थिती व गरज लक्षात घेऊन संसदेला संविधानात दुरुस्ती नाही तर फेरफार करण्याची तरतूद कलम 368 मध्ये केलेली आहे.मुळातच फेरफार या शब्दांचा अर्थ एक सोडून त्या जागी दुसरा घेणे,अदला बदल करणे,काढून टाकणे व समाविष्ट करणे ई.ई.असा होतो.

हाच अर्थ भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. म्हणून मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना केंद्र शासनास सूचित करु इच्छितो यापुढे त्यांनी संविधानाची दुरुस्ती हा शब्द न वापरता संविधानात फेरफार हा शब्द वापरुन आपले शहाणपणा दाखवावे कारण दुरुस्ती या शब्दामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.

अशी महत्त्व पूर्ण माहिती दादासाहेब शेळके (संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना) सामाजिक संघटना यांनी आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सिध्दार्थ दिवेकर यांना प्रत्यक्ष भेट देऊन दिली आहे.