चौसाळा शहरात विविध सामाजिक उपक्रमाने छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

28

🔹मुस्लिम तरूणांनीही केले रक्तदान 

✒️चौसाळा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चौसाळा(दि.19फेब्रुवारी):- कुळवाडी भुषण राजाधिराज छञपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती चौसाळा शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.विविध सामाजिक उपक्रम युवा नेते शैलेश जोगदंड मिञ मंडळाच्या वतीने राबविण्यात आले .प्रथमता छञपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाटाचे जेष्ठ नेते डॉ बाबु जोगदंड साहेब यांनी पुष्पहार अर्पण केले .

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर शंशिकात जोगदंड सर यांचे व्याख्यान घेण्यात आले तसेच रक्तदान शिबिरही घेण्यात आले या रक्तदान शिबीरात अंसख्य युवकांनी रक्तदान केले तसेच मुस्लिम युवकांनीही रक्तदान केले .या जयंतीमध्ये सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाटाचे जेष्ठ नेते समाजरत्न डॉ.बाबु जोगदंड साहेब,सयाजी बप्पा शिंदे , आयोजक सामाजिक कार्यकर्ते शैलेश जोगदंड, शिवशाहीर शंशिकात जोगदंड सर, श्रीमंत सोनवणे, बाळासाहेब जोगदंड, साहेब युवा नेते विवेक (बाबा)कुचेकर,पञकार अजमेर मनियार, बाळासाहेब राऊत, सुधीर भैय्या नाईकवाडे,नंदु आबा जोगदंड,काकासाहेब नाईकवाडे, प्रा,रविद्रं जोगदंड, पंजाब वाघमारे, मराठा महासंघाचे बकंट शिंदे, आकाश काळे, निलेश जोगदंड,वैभव सोनवणे यांच्यासह असंख्य शिव मावळे मोठया संख्येने उपस्थित होते.