शिवजयंती दिवाळीसारखी साजरी करा – प्रा अनिल डहाके

33

🔹विचारज्योत फाऊंडेशन तर्फे शिवजयंती साजरी…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घराघरामध्ये दिवाळी सारखी साजरी केली पाहिजे. घरी दिवे लावून, गोड जेवण बनवून, घरातील लहान मुलांकडून शिवचरित्राचे वाचन करून उत्साहात, आनंदात प्रत्येकाने शिवजयंती साजरी करायला पाहिजे असे मत प्रा. अनिल डहाके यांनी विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीच्या निमित्याने चंद्रपूर येथे विचारज्योत फाउंडेशन तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण आणि मालार्पण करून करण्यात आली. यावेळी युवा वक्ते आकाश कडूकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि वर्तमान महाराष्ट्रातील दयनीय अवस्था यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिवजयंती कार्यक्रमाला विचारज्योत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज पी. दहागावकर, सचिव मुन्ना तावाडे, इंजी. नरेंद्र डोंगरे, प्रा. अनिल डहाके, युवा वक्ते आकाश कडुकर, अविनाश रामटेके, सिद्धार्थ चव्हाण, सारंग चालखुरे, बिराज नारायणे, प्रशांत रामटेके, शुभम जुमडे, शरद खोब्रागडे, प्रदीप गुरनुले आदी उपस्थित होते.