ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन तर्फे विद्यार्थ्यांची बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 19 फेब्रुवारी) :-इंटरनॅशनल ट्रेडिशनल शितो-रियु कराटे असोसिएशन इंडिया, शाखा ब्रम्हपुरी अंतर्गत येत असलेल्या नागभीड आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची बेल्ट परीक्षा आज दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी रविवारला ब्रम्हपुरी येथे घेण्यात आली. ह्यामध्ये, ब्रम्हपुरीच्या आणि ट्विकंल इंग्लिश स्कूल, नागभीड येथील कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व उत्कृष्ठ विद्यार्थ्यांचा पुरेपूर सहभाग होता.

सदर बेल्ट परीक्षा, आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक शिहान- श्री.गणेश लांजेवार सर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. ह्या बेल्ट परीक्षा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री.उदयकुमार पगाडे (संस्थापक – न्यू लाईफ फाउंडेशन, ब्रम्हपुरी) आणि इतर मान्यवर उपस्तिथ होते. ह्यांनी, सर्व विद्यार्थ्यांना आत्म-रक्षा, मार्शल आर्ट, कराटे यांबद्धलं मार्गदर्शन केले.

संपूर्ण परीक्षा सेन्सेई- क्रीष्णा समरीत, सेन्सेई- तुषार वटी यांचा नियंत्रणात घेण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्री-गणेश तर्वेकर सर,(महाराष्ट्र उपाध्यक्ष-आष्टेडू मर्दानी आखाडा), शिहान-शेख दत्तू सर (अध्यक्ष-इंटरनॅशनल ट्रॅडिशनल शितो-रियु कराटे असोसिएशन इंडिया) यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण बेल्ट परीक्षामध्ये शुभांगी मेश्राम, पारस समर्थ, धनश्री वनस्कर, श्रावणी पोपटे, तेजस्विनी भाजीपाले आणि इतर सिनिअर कराटे खेडाळू प्रामुख्याने हजर होते.