मांडवा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.20फेब्रुवारी);- तालुक्यातील मांडवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच अल्का ढोले ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विजय राठोड ,पोलीस पाटील दत्तराव पुलाते, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे,ग्रा.पं.सदस्य कमल राठोड,गोपाल मंदाडे हे उपस्थित होते.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मंदाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालय मांडवास सप्रेम भेट दिली .

त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या वतीने ग्राम परिवर्तन समिती मांडवा २०२३च्या अध्यक्षपदी बजरंग पुलाते तर उपाध्यक्ष म्हणून समाधान आबाळे यांची निवड करण्यात आली. व त्यांचे स्वागत करू त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राघोजी ढोले, दगडू ढोले,अरुण मंदाडे, माजी सरपंच भोपासिंग राठोड, रमेश ढोले, हरिभाऊ धाड, कैलास राठोड, देविदास गजभार, गजानन आबाळे, सुरेश राठोड, अनिल राठोड, कार्तिक धाड,राहुल जाधव,वैभव घुक्से ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे ,शेषराव जाधव तसेच प्रतिष्ठित नागरिक व इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पुलाते यांनी केले तर आभार हरिभाऊ धाड यांनी मानले.