बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये मोठी चूक, विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण?

39

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22फेब्रुवारी):-राज्यातील बारावी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच शंभर टक्के अभ्यास क्रमांकावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये गंभीर चूक समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 च्या A3 To A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अनुराधा ओक यांनी संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करून योग्य न्याय दिला जाईल असे म्हटले आहे.

पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 च्या A3 To A5 या क्रमांकाच्या प्रश्न ऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. यावर खुलासा करताना राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भात एक जाहीर पत्र काढले आहे. ओके यांनी सांगितले की, प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची विषय तज्ञ आणि विभागीय मंडळाच्या प्रमुखाबरोबर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र शिक्षकांचा आपल्या धोरणात्मक मागण्या संदर्भात बहिष्कार असल्याने आजची सभा झाली नाही. त्यामुळे आजची सभा पुन्हा एकदा बोलवण्यात येईल. त्यात आज पार पडलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी बाबत दखल घेतली जाईल. संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला जाईल. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू असे त्यांनी म्हटले आहे