ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भध्यक्ष नरेंद्र नवनीत इंगळे यांना अमरावती येथे युवारत्न पुरस्कार

77

✒️अकोला(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अकोला(दि.22फेब्रुवारी):- त्यागमुर्ती माता रमाई जयंती निमित्ताने आयोजीत “युवा असावा महत्वकांशी सकारात्मकतेने ओतप्रोत मिळता योग्य दिशा उजळेल प्रगतीची ज्योत” समाजिक क्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरी करत असणारे ग्रामीण युवा संघटनेचे तथा संकल्प बहुउद्देशिय संस्था पारस चे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र नवनीत इंगळे यांच्या सामाजिक कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या कामाची पावती म्हणुन अमरावती येथे महाराष्ट्र बेस्ट न्यूज तथा दैनिक मतदार राज यांच्या वतीने “युवारत्न पुरस्कार २०२३” देण्यात आला आहे. नरेंद्र नवनीत इंगळे हे एक छोट्याशा गावामध्ये राहून समजात असलेल्या अनेक अडचणीवर मात करत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात रात्र दिवस लोकांची मदत करीत असतात.

संकल्प बहुउद्देशिय संस्था पारस ही त्यांची संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून २०० पेक्ष्या जास्त युवक युवतीचे लग्न सुधा जुळवून आणले आहे व पुणा,अमरावती,अकोला येथे बुद्धीष्ट मॅरेज ब्युरो चालवतात व याच्या माध्यमातून युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन सुद्धा करत राहतात अश्या अनेक प्रकारे नरेंद्र नवनीत इंगळे हे पूर्ण विधर्भामध्ये ग्रामीण युवा संघटनेमध्ये काम करीत असून त्यांना काही महिन्यांपूर्वीच नागपूर येथे “बहुजन समाज मित्र पुरस्कार २०२२” देण्यात आला व आज अमरावती येथे “युवारत्न पुरस्कार २०२३” देण्यात आला आहे.