छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

35

🔹शहरातील शासकीय आयटीआय येथे शिवजयंती संपन्न

✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.23फेब्रुवारी):-:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न.वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरातील शासकिय आयटीआय कारंजा घाडगे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.दिनांक १९/२/२०२३ रोज रविवारला छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली.त्याचप्रकारे राज्यभरातील शाळेत व महाविद्यालयात देखील महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आयटीआय कॉलेज मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम महाराजांच्या फोटोंचे पूजन व फोटोला हार घालण्यात आले व उपस्थित सर्वांनी दोन मिनिट महाराजांच्या जीवनावर बोलत त्यांना अभिवादन केले.यावेळी आयटीआय कॉलेज येथील इंस्त्रॅक्टर पी.एस.पडोळे,शिक्षक दशरथ डांगोरे,शिक्षक डी.ओ.चरडे,सामाजिक कार्यकर्ते उमेश पाचपोहर,विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर,आत्रामकर सर, प्रज्वल बारंगे आदी उपस्थित होते.