उज्वल भविष्यासाठी आजच्या महिलांनी जिजामाता बनण्याची आवश्यकता – प्रा. लक्ष्मण मेश्राम

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23फेब्रुवारी):-दिनांक 19 फेब्रुवारी 2023 ला चोरटी येते शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मा.अनंताजी बनपूरकर अध्यक्ष से .सह. सं. चोरटी हे होते तर उपाध्यक्ष म्हणून श्री मा. नरेंद्रजी मैंद हे होते. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. प्रा लक्ष्मण मेश्राम सर बोलताना म्हणाले की, उद्याचं उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आजच्या महिलांना राजमाता जिजाऊ यांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या विचारातून भावी पिढी योग्य सुसंस्कृत वैचारिक व संयमी आणि एक चांगला व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तसेच भावी शिवाजी महाराज निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांचे विचार अंगीकारून आत्मसात केले पाहिजे तेव्हाच भावी शिवाजी निर्माण होऊ शकेल असे विचार त्यानी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

दुसरे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले. मा. प्रा पंकज बेंदेवार सर आपल्या मार्गदर्शनातून बोलताना म्हणाले की, इतिहासाची साक्ष देऊन वर्तमानात काय बदल होत आहे. हे वेगवेगळे दाखले देऊन स्पष्ट केले.ते म्हणाले की शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाला जर कोणी हात लावेल तर त्याचे हात तोडले जातील. त्यांच्या पिकाला योग्य भाव दिला जात होता शेतकऱ्यांना मोफत सातबारा देण्यात आला. आणि वर्तमानातील शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था आहे. हे यातून त्यांना स्पष्ट करायचे होते ते म्हणतात आज शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही शेतकरी आत्महत्या करत आहे पण शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी स्वतः शिवाजी महाराज घेत होते.

रयतेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. याची काळजी शिवाजी महाराज घेत होते म्हणून चारशे वर्षांपासून त्यांची जयंती साजरी करत आहोत राज्य कसं असावं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावे अशी त्यांनी सांगितले. देशात कित्येक राजे झाले. पण ज्यांनी रयतेसाठी राज्य केले असे राजे बोटावर मोजण्यासारखे एक दोनच राजे आहेत.

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दत्त व्यवस्थापन समिती द्वारा आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सामान्य ज्ञान स्पर्धा ही दोन वयोगटात घेण्यात आले एक 10 ते 14 वयोगटातील . दुसरा गट 15 वर्षावरील. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ पुस्तक व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता 10 वि व इयता 12वि च्या वर्गातील सर्वाधिक टक्केवारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोणशिट्टीवार पी .एस. सी चौगान .खरवडे सर, कु. सुनीता वलके पो. पा, सौ निशा मळावी सरपंच ग्रापं चोरटी मा. विश्वनाथ थोरे ढोरे अध्यक्ष तंटामुक्त समिती चोरटी, मा. राजेश्वर खरकाटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दादाजी वाटकर ,बाळकृष्ण मेश्राम, गंगाधर बुराडे, भास्कर प्रधान ,गणेश प्रधान गायधने सर ,बनकर सर आणि गावातील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्तीत होते . शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य समाजप्रबोधन पर कीर्तनाचा आयोजन करण्यात आले होते.कीर्तनकार सौ. जयश्री गावतुरे यांच्या ओजस्वी वाणीतून समाज प्रबोधन पर कीर्तनाचे आयोजन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयगोपाल चोले यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रवीण प्रधान यांनी केले .कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्तीत होते.