राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी श्री. मारोतरावजी अतकरे सर

31

🔹राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी श्री कवडू लोहकरे यांची नियुक्ती

✒️सुयोग सुरेश डांगर(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.23फेब्रुवारी):- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चळवळीला व्यापक स्वरुप येण्यासाठी व ओबीसी समाजाच्या न्याय व हक्काला लढा देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी -अधिकारी महासंघाच्या अध्यक्ष व सचीव पदाची नियुक्ती हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात आली.

१९ फेब्रुवारी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षपदी श्री. मारोतरावजी अतकरे सर तर सचीव पदी श्री. प्रभाकरराव लोथे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी कवडू लोहकरे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचीव पदी रविंद्र उरकुडे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक प्रा. राम राऊत , जिल्हा सहसचीव रामदास कामडी,राजेंद्र शेंडे , ईश्वर डूकरे ,श्रीहरी सातपुते, प्रा.पितांबर पिसे , राजकुमार माथुरकर , योगेश थुटे, प्रभाकरराव पिसे , राजेंद्र लोणारे , अविनाश अगडे,नागेश चट्टे , धर्मदास पानसे, सुखदेव वाघे, दिलीप डुकरे ,राजू दांडेकर, ताराचंद बोरकुटे, पटवारी कोपहरे श्रृतिका बंडे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.नवनियुक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व सचीव यांचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.