विद्यार्थ्यांनी आई-वडिलांसह शिक्षकांचा आदर पाळल्यास उच्चशिक्षित व आदर्श विद्यार्थी घडतील- डॉ. गोकुलदास बालपांडे

27

🔹निरुपा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 25 फेब्रुवारी):-आई-वडिलांचे स्वतःच्या मुलावर संस्कार जरी असले तरी शिक्षकांनी सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले पाहिजेत तद्वतच विद्यार्थ्यांसाठी आई-वडिल गुरुस्थानी असले तरी शिक्षकही त्यांचे गुरु असतात आणि गुरुचा आदर विद्यार्थ्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत तेव्हाच त्यांच्या आयुष्याला वळण लागुन विद्यालयातून शिक्षण घेतल्याचे समाधान होईल शिवाय उच्चशिक्षित, पदवीभूषित, व आदर्श विद्यार्थी घडतील व त्यांचा आनंद द्विगुणित होऊन आई-वडिलांसह शिक्षकांना आपले अध्यापन सफल झाल्याचे समाधान लाभेल असे मौलिक विचार निरुपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोकुलदास बालपांडे यांनी मांडले.

दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी निरूपा विद्यालयातील वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांकडून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वती व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी निरूपा विद्यालयातून शिक्षण घेणारा खरकाडा गावातील विद्यार्थी व सध्या प्राध्यापक पदावर दुसऱ्या शाळेत नोकरी करणारे प्राध्यापक लक्ष्मण मेश्राम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार निरुपा विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून निरुपा शिक्षण संस्थेचे सदस्य श्री. पंढरीजी प्रधान बाबुसाहेब, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद ठाकरे, निरुपा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. पी. तिजारे सर, खरकाडा येथील प्रतिष्ठित नागरीक श्री. मनोज मैंद, निलजचे प्रतिष्ठित नागरीक श्री. देवरावजी भुते, शिक्षक पालक संघाचे सहसचिव श्री. दिवाकर ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. सी. धोंगडे सर,खरकाडा येथील उपसरपंच श्री. ताराचंद पारधी, इन्स्पायर ॲकॅडमी ब्रम्हपुरी चे संचालक प्रा.लक्ष्मण मेश्राम सर, डॉ. मयूर बालपांडे, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ब्रम्हपुरी च्या उपाध्यक्षा सौ. सुरेखाताई बालपांडे, सौ. उषाताई तोडकर,रणमोचन येथील प्रतिष्ठित नागरीक श्री. विश्वनाथजी तोंडरे, पत्रकार विनोदजी दोनाडकर, पिंपळगाव चे प्रतिष्ठित नागरीक श्री. चरण तुपट, निकुरे कोचिंग क्लासेस बरडकीन्ही चे संचालक श्री. विकेश निकुरे, सहाय्यक शिक्षक भागवत लंजे सर, नरेश मडावी सर, सुधा बावनकुळे मॅडम, सुनिता राऊत मॅडम,आकाश चिलबुले बाबुसाहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी तथा वर्ग 10 वी व वर्ग 9 वी चे विद्यार्थी तसेच वर्ग 8 वीचे वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 9 वी ची विद्यार्थीनी कु. दिशा दिवाकर ठाकरे हीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण भागवत लंजे सर यांनी केले व सर्वांचे आभार वर्ग 9 वी ची विद्यार्थीनी कु. सृती सदानंद वनस्कार हिने मानले.