शिवकल्याण संस्थेच्या वतीने “परिघा बाहेरील स्त्री” या विषयावर महिला संवाद

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.26फेब्रुवारी):- शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने धानोरा येथे परिघाबाहेरील स्त्री या विषयावर महिला संवाद कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे मुख्य हेतू महिलांनी घर कामातून स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा व आपल्या आरोग्याचे व आपल्या स्वप्नांचे वा आवडीनिवडीचे कार्य करावे ज्यामध्ये त्यांना त्यांच्या मर्जीतील आयुष्य जगता येईल. सोबतच या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धानोरा नगरपंचायत माजी नगराध्यक्ष वर्षाताई चिमूरकर, मुख्य मार्गदर्शक महिला व बालविकास विभाग सुपरवायझर उषाताई थोरात, मुख्य अतिथी म्हणून शिवकल्याण संस्था सहसचिव संतोषी सूत्रपवार, अंगणवाडी सेविका वंदनाताई चिमूरकर, सरिताताई हेमके उपस्थित होते.

परिघाबाहेरील स्त्री या विषयावर पार पडलेल्या महिला संवाद कार्यक्रमात 40 महिलांनी सहभाग नोंदविले, या संवादात महिला मोठ्या हिरीरीने सहभागी झाल्या. अनेक महिलांना या ठिकाणी व्यक्त होता आले. व दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना येणारी अनेक संकटे त्यावर महिला मोकळ्यापणाने बोलल्या, मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास व घ्यावयाची काळजी यासंदर्भात सुद्धा स्त्रियांनी आपले अनुभव मांडले.

कार्यक्रमातील उपस्थित मुख्य मार्गदर्शकांनी असे कार्यक्रम शहरांमध्ये, गावामध्ये होणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता सूत्रपवार यांनी केले. धानोरा येते पार पडलेला हा कार्यक्रम प्रायोगिग तत्वावरील कार्यक्रम असून अश्याच पद्धतीचे मोठे उपक्रम येणाऱ्या दिवसात संपूर्ण जिल्हाभरात राबविनार असल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.