वंचित चे पुसद तालुकास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण सोहळा संपन्न

33

🔹पक्षाचा इतिहास व उल्लेखनीय कार्य माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे..!!. भास्कर भोजने

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.27फेब्रुवारी):-जिल्ह्यातील पुसद येथे वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता समीक्षा, संघटन, संवाद प्रशिक्षण शिबिराचे एकदिवसीय आयोजन आज दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाले.

सविस्तर वृत्त असे की, पुसद तालुका वंचित बहुजनआघाडीच्या वतीने पुसद शहरातील शंकरराव सरनाईक वाचनालय येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात कार्यकर्ता संघटन, समीक्षा, संवाद प्रशिक्षण शिबिराचे एकदिवसीय आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून,फुले आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र समन्वयक,भास्कर भोजने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ पश्चिम जिल्हाप्रभारी मोहन राठोड हे होते.सर्वप्रथम भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला बगल देत मुख्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करण्यात आली.

आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे विचार इतिहास व पक्षाने केलेले कार्य हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून प्रशिक्षण शिबिर घेणे ही नितांत आवश्यकता असते.आपला पक्ष उल्लेखनीय कार्य केल्याच्या जोरावर इतर पक्षाच्या तुलनेत भरीव कार्य करू शकतो ही माहिती जेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला असेल तेव्हा तो कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी भरीव कार्य करू शकतो पक्षाचा जन्म आज पर्यंतचा इतिहास व केलेले कार्य हे सांगता आले पाहिजे.

म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राभर् तालुका, जिल्हा, पातळीवर प्रशिक्षण,संघटन कौशल्य व संवाद,अश्या त्रिसूत्री कार्यक्रमाच्या कामाची माहिती याच प्रशिक्षण शिबिरातून दिले जाते म्हणून पक्षाच्या सभा संमेलना बरोबर अशा शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे असे प्रतिपादन मुख्य मार्गदर्शक म्हणून भास्कर भोजने हे प्रशिक्षण शिबिराच्या प्रमुख कार्यक्रमात बोलत होते.वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने दुसऱ्यांन्दा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याने पुसद तालुका महाराष्ट्रात आघाडीवर असल्याचे शाखेच्या कामाचे कौतुकही करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने उपस्थित अध्यक्ष जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यवतमाळ, प्रमुख मार्गदर्शक भास्कर भोजने सर, प्रा.डॉ. विठ्ठल खाडे, मोहन राठोड जिल्हा प्रभारी यवतमाळ, दामोदर साहेब, जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खाडे, जिल्हा संघटक राजकुमार टाळीकोटे, जिल्हा सचिव विजय लहाने,पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,रिपब्लिकन वार्ता न्यूज चे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले,भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष भारत कांबळे, दीपक पद्मे ,सचिन सूर्यवंशी, मधुकर सोनवणे,स्वप्निल

पाईकराव, शेख मोसिन,शंकर करमणकर, भास्कर बनसोडे, रमेश खंदारे, राहुल जोगदंडे, , शरद खंदारे, अनिल कांबळे ,संघपाल कांबळे, संदीप कांबळे,कैलास धबाले, राहुल धुळे, शुभम खंदारे, सिद्धार्थ बर्डे, विठ्ठल टाळीकोटे, डॉक्टर अरुण राऊत, संतोष अर्धापुरकर,अजय जाधव, गजानन थोरात, विद्याताई नरवाडे, इंदुबाई वानखेडे, बेबीताई थोरात,राधिका हराळ, अर्चना शिंदे, ज्योती निकम, छाया राठोड, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आर. पी. गवई यांनी केले तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी केले व् आभार प्रदर्शन डॉ. अरुण राऊत यांनी केले.या कार्यक्रमाला पुसद तालुक्यातील विविध शाखेचे,पदाधिकारी,कार्यकर्ता,महिला पुरुष व युवक प्रामुख्याने उपस्थित होते.