‘फळाहार सर्वोत्तम आहार’बाबत कृषी विभागातर्फे स्लोगन स्पर्धा

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 27फेब्रुवारी):- निरोगी आयुष्यासाठी, विविध जीवनसत्वाच्या आवश्यक पुर्तीसाठी आणि शरीराच्या बळकटीसाठी रोज एगक तरी फळ खाणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्वोत्तम स्लोगन स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेत शेतकरी, नागरीक तसेच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. उत्कृष्ट स्लोगनकरीता प्रथम बक्षीस 3 हजार, द्वितीय बक्षीस 2 हजार तर तृतीय बक्षीस 1 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. स्लोगनची थीम ‘रोजच्या आहारात फळाचा वापर आवश्यक करणे व त्याचं महत्व पटविणे’ ही आहे. स्लोगन यापूर्वी प्रसारीत झालेले नसावे, स्लोगन संक्षिप्त व स्पष्ट असावे.

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2023 असून आपले स्लोगन कृषी भवन, चंद्रपूर अथवा dsaochandrapur@gmail.com वर पाठविता येतील. स्लोगन पाठविताना आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा. आपले स्लोगन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किंवा आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी येथे व्यक्तिशः सादर करता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.