सुगतकुटीच्या विकासासाठी 4 कोटी निधी मंजूर-आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या प्रयत्नास आले यश

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28फेब्रुवारी):-तालुक्यातील मालेवाडा येथे बौद्ध बांधवांचे सुगतकुटी श्रध्दास्थान असून त्या ठिकाणचा विकास होणे आवश्यक होता. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी लक्ष केंद्रित करून सातत्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कडे पाठपुरावा करीत होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत 4 कोटी रु विकास निधी मंजूर केला असून त्या ठिकाणी सुसज्ज सभागृह, सौंदर्यीकरण कामे प्रस्तावित आहे.

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांचा विकास करणे हेतू या घटकांना मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सुगतकुटी च्या विकास काम करण्यासाठी पाठपुरावा करीत होते. सुगतकुटी येथे बौद्ध बांधव यांचे कार्यक्रम होत असतात. तेव्हा त्या ठिकाणी सभागृह, सौदर्यीकरणे गरजेचे होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना शासन निर्णय क्र सावियो 2023/ प्रक्र 64 / अजाक परीशिष्ठ अ नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सुगतकुटी मालेवाडा परिसरात दलित विकास निधी अंतर्गत बांधकाम सभागृह, परिसर सौंदर्यीकरण करणे व सोयी सुविधा निर्माण करणे यासाठी 4 कोटी रु मंजूर झाले आहे.

सुगतकुटी येथे 4 कोटी रु निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे भाजप अनुसूचित जाती आघाडी तालुका अध्यक्ष जयंत गौरकर, सतीश वानखेडे, हंसराज श्रीरामे, पराग अंबादे, सागर भागवतकर, शैलेश पाटील आदी नी अभिनंदन केले.