औरंगाबाद नामांतरास आक्षेप फॉर्म भरणे सुरू

28

🔹जावेद खान यांचे आवाहन

🔸एका दिवसात नोंदविले पाच हजार आक्षेप

✒️विशेष प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

औरंगाबाद(दि.8मार्च):-राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करण्याचे राज्य आणि केंद्र शासनाने जाहीर केले आहे. या नामांतरास ज्या नागरिकांचे आक्षेप असतील तर ते 27 मार्च पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे हरकती मागविण्यात आल्या आहेत.त्यासाठी शहरातील युवकांनी पुढाकार घेतला असून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबादचे नाव बदलू नये म्हणून दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक आक्षेप फॉर्म भरून देत आहेत. शहराचे नाव बदलल्यानंतर सर्वांनाच आपापली कागदपत्रे बदलावी लागतील त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागेल पैसा आणि वेळ वाया जाईल आधीच नागरिक महागाईने त्रस्त झालेले असून त्यात ही नवी भर पडणार आहे.

नामांतरास नागरिकांचा विरोध आहे परंतु हा विरोध लेखी स्वरूपात नोंदवायचा आहे सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व आक्षेप नोंदवावे असे आवाहन जावेद खान यांनी केले आहे. शहरातील हुसेन कॉलनी येथे आक्षेप नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. एका दिवसात पाच हजार नागरिकांनी आक्षेप नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यासाठी शेख कलीम, शाकीर पठाण, रफिक पटेल, साजिद खान ,लुकमान पटेल, मुजीब खान, आफताब खान ,समीर खान, अरिफ खान, युसुफ पटेल,फिरोज खान, आरेफ बागवान आदींनी परिश्रम घेतले.