महात्मा फुले हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा !…

30

🔸महामातांचे कार्य प्रेरणादायी – जे एस पवार [ मुख्याध्यापक ]

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.8मार्च):– शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ८ मार्च जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या व मुलींच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याराणी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी महामातांचे जीवन कार्य विशद केले यासोबतच या सर्व महामातांचे जीवन आपल्यासाठी ऊर्जादायी व प्रेरणादायी आहे.

महामातांच्या विचारांवर चालण्याचा मोलाचा संदेश दिला. इतिहास विभाग प्रमुख व्ही टी माळी सर यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून विस्तृत अशी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून मुला-मुलींमध्ये भेद करू नका. आजची महिला गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली याचे श्रेय सर्व सावित्रीमाईंना जाते. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या सर्व महामातांचा आदर्श घ्या असा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले.