सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ दिवेकर यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल रमामाता महिला मंडळ तर्फे भव्य सत्कार

31

✒️ यवतमाळ(पुरोगामी न्युज नेटवर्क)

यवतमाळ(दि. 8 मार्च):- शहरातील सम्यक बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड, उमरखेड येथे रमामाता महिला मंडळा तर्फे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रमामाता महिला मंडळा कडून हिराबाई दिवेकर (माजी न.प.नगरसेवीक), शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर,यशोधरा धबाले, भारताबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, यशोदा दिवेकर, जानकाबाई इंगोले, मीराबाई दिवेकर, उषाबाई इंगोले, राधाबाई केंद्रेकर, बेबाबाई गावंदे,दिलीप कांबळे, मनोज इंगोले, भिमराव दिवेकर शंकरराव दिवेकर ह्या सर्वांनी शाल व पुष्गुच्छे देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

व तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर, कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदूत समिती) त्याच बरोबर नितीन आठवले यांचा ही समाजकार्याबद्दल महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सर्व कार्यक्रम अतिशय आनंद उत्सवामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.