चिमूरात काँग्रेसच्या “हाथ से हाथ जोडो” अभियानाला उत्तम प्रतिसाद

38

🔸रॅलीचे माध्यमातून भारतीय स्टेट बँकेला दिले निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.9मार्च):- अमेरिकेतील हिंडेनवर्ग संस्थेच्या अहवालाने अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार अदानी उद्योगपतीवर मेहरबान असल्याचे उघड झाले आहे. मोदी सरकारचे धोरणच ‘हम दो-हमारे दो’ असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक परिस्थितीतून जात असताना पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्वाचे सार्वजनिक उद्योग व पायाभूत सुविधा अदानी समूहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. देशातील जनतेचा एसबीआय आणि एलआयसी सारख्या सार्वजनिक संस्थांमधील कष्टाचा पैसा मोदी सरकारने अदानी समुहात बेकायदेशीरपणे गुंतवला. कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीयांची करोडो रुपयांची बचत य गुंतवणूक धोक्यात आली आहे.

काँग्रेस पक्ष हा मुद्दा संसद, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि लोकांसमोर सर्व स्तरांवर मांडत आहे. काँग्रेस पक्षाने दि. १७ फेब्रुवारी रोजी देशभरातील २३ शहरामध्ये पत्रकार परिषदा घेऊन मोदी सरकार य अदानीच्या महाघोटाळ्याची पोलखोल केली. हा मुद्दा आपल्याला जास्तीत जास्त लोकापर्यंत घेऊन जायचा आहे. असे यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद आयोजित करून अदानी-मोदी संबंध व महाघोटाळ्याची पोलखोल करण्याबाबत कळविले आहे. प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी निर्देश दिल्यावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच दि. ६ ते १० मार्च २०२३ दरम्यान राष्ट्रीयीकृत बँका आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर तालुका स्तरावर आंदोलनाचे नियोजन करावे. असे निर्देश देण्यात आले. सदर आंदोलनात जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते, आजी-माजी खासदार आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांचे सदस्य व कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने सहभागी करावे, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार आज दि. १० मार्च ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान चिमूर तालुका काँग्रेस कार्यालयापासून संपूर्ण चिमूर शहरातून काढण्यात आली.

यावेळी स्टेट बँकेतील बँक कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर यांच्या नेत्रुत्वात रॅली काढण्यात आली. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस सेवा दलाचे किशोरबापू शिंगरे, काँग्रेस सेवा दलचे प्रदेश सचिव राम राऊत, तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, संजय डोंगरे, रोशन ढोक, विनोद ढाकुणकर, नागेन्द्र चट्टे, अवि अगडे, पवन बंडे, विजय डाबरे, राकेश साटोणे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सविता चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, रिता अंबादे यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.