इन्स्पायर करिअर अकॅडमी तर्फे भू- वैकुंठ अड्याळ टेकडी येथे महिला दिन साजरा

105

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 9 मार्च):-स्थानिक ब्रह्मपुरी येथील इन्स्पायर करिअर अकॅडमी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून यावर्षी महिला दिन भू- वैकुंठ अड्याळ टेकडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मातोश्री मंजुळामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भजन संध्या हा कार्यक्रम इन्स्पायर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अड्याळ टेकडीच्या महिला विभाग प्रमुख रेखाताई ह्या होत्या.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा होते प्रमुख अतिथी म्हणून प्रा. तेजस गायधने, प्रा. लक्ष्मण मेश्राम ,प्रा .विवेक खरवडे प्रा.प्रवीण प्रधान ,अंकिता गायधने म्याडम , प्रा.अविश तुपकर, प्रा. होमराज लोनबलेहे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भू- वैकुंठ अड्याळ टेकडीचे अध्यक्ष नवलाजी मुळे यांनी केले प्रास्ताविक व आभार देवानंद ठाकरे सर यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी तृप्ती नागदेवते,सपना दोनाडकर,श्रेया चेल्लीरवार यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष ठाकरे,राम नवघडे, पवन पिसे, वैभव आत्राम इत्यादींनी सहकार्य केले.