ग्रामीण भागात अल्पसंख्यांक समाज प्रधानमंत्री घरकुल योजने च्या प्रतीक्षेत – डॉ.आयुब खा पठाण

35

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995469

उमरखेड(दि. 13 मार्च):- ग्रामीण भागात तालुक्यातील उमरखेड अल्पसंख्याक समाज प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहे अल्पसंख्यांक समाजाला घरकुल असा इतर योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक समाज करीत आहे.ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात राहतो मात्र या समाजाचा विविध विकास कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

स्थानिक ग्रामपंचायती मार्फत गरजू गरीब अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना घरकुल योजनेमार्फत घरकुल दिले जाते.
मात्र या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना ग्रामीण भागात घरकुल योजने पासून वंचित ठेवले आहे.

ग्रामीण भागात अल्पसंख्यांक समाजाचे काही गोरगरीब ताटव्याच्या घरामध्ये राहते पावसाळ्यामध्ये अवकाळी पाऊस चक्रीवादळ अशा या संकटाचा सामना करावा लागतो असे अल्पसंख्याक समाजातील लोकांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम शहा छप्पर बंद संघटना अध्यक्ष डॉ.आयुब खा पठाण संघटने कडून केली जात आहे.