लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी वर बक्षीसाचा वर्षाव

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15मार्च):-लॉयन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे “शिखर” रिजन कॉन्फरन्स अभुतपुर्व वातावरणात 11 मार्च ,शनिवारी जालना येथे पार पडली. या कॉन्फरन्स मध्ये जालना , बीड , परभणी येथील 400 लॉयन्स सदस्यानी सहभाग नोंदविला. यामध्ये लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी ने तब्बल नऊ पारितोषिक पटकावले.

प्रांतपाल पुरुषोत्तम जयपूरीया यांच्या हस्ते तसेच रिजन चेअरपर्सन सुनिल बियाणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी याना जी एस टी चे सर्व्हिस फर्स्ट एक्टीवीटी, बेस्ट मॅरेथॉन, पर्यावरण रक्षक, बेस्ट सिग्नेचर एक्टीवीटी, मॅक्सिमम अटेडंस 2 , क्लब अप्रिसेशएन, तसेच भगत सुरवसे याना रिजन मधील बेस्ट सेक्रेटरी ऑफ रिजन सिल्व्हर अवार्ड व ईलॉक्युटेन बेस्ट सेक्रेटरी या अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे कॅबिनेट ऑफिसर अतुल गंजेवार, अध्यक्ष गोविंद रोडे, सचिव भगत सुरवसे, कोषाध्यक्ष संजय सुपेकर, सहसचिव मकरंद चिनके, सहकोषाध्यक्ष गोपाळ मंत्री, लॉयन्स सदस्य विष्णू मुरकुटे, नागेश केरकर, अभिजित चौधरी, महेंद्र कांबळे, महेंद्र वरवडे, विठ्ठल शिंदे व राजेश पाठक हे उपस्थित होते.लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी च्या पहिल्याच वर्षी मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे गंगाखेड शहरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे