नगरपरिषद कर्मचारी आहेत जुनी पेन्शन मागणीसाठी बेमुदत संपात सहभागी

30

✒️सिध्दार्थ दिवेक(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.15 मार्च):-जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप एकच मिशन जुनी पेन्शन एन पी एस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी 14 मार्च 2023 पासून पुकारलेल्या बेमुदत संप पुकारला.

उपरोक्त अनुषंति की राज्यातील कर्मचारी रोजदारी कर्मचारी याच्या विविध मागण्या व सदर नोट शासनावर निर्णय घेण्याकरीता राज्यातील नगरपरिषदाती कर्मचारी संपावर आहेत.

नगरपरिषद उमरखेड येथील सर्व कर्मचारीदिनांक 14.03.2023 पासून बेमुदत संपावर जात करीता आहे.या संपात उमरखेड नगरपरिषद चे कर्मचारी समन्वय एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज नगरपरिषद तहसील कार्यालय पंचायत समिती यासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उमरखेड नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले तर याप्रसंगी धरणे आंदोलनात सहभागी नगरपरिषद चे सगळे कर्मचाऱ्यांनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, असे कसे मिळत नाही मिळालेच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शनचे नारे देऊन उमरखेड वासीचे लक्ष वेधत शासनाला जागविण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान विविध आदोलन घेऊन त्यांच्या रास्त मागणीला आपला जाहीर दर्शविला आहे उमरखेड नगर परिषद चे कर्मचारी श्री गंगाधर बावलगाव श्री गिरीश गारोळे श्री रितिकेश पाटील कर्मचारी उपस्थित होते.