पुरोगामी महिला मंच तर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम थाटात संपन्न

32

🔸विविध उपक्रम व कार्यक्रमाने वेधले सर्वांचे लक्ष

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.18मार्च):- महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती महिला मंच द्वारे ‘जागतिक महिला दिन चा कार्यक्रम थाटात पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती चिमूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रम मध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. महिलांनी महिलांच्या वतीने महिलांकरिता आयोजित केलेला हा कार्यक्रम होता.

या प्रसंगी ‘महिला शक्ती’ या विषयावर पोस्टर स्पर्धा, महिला दिन या विषयावर स्वयंस्फूर्त गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक व सामूहिक नृत्य स्पर्धा, स्त्री आरोग्य, कायदे ,जनजागृती या विषयावर उद्बोधनात्मक मार्गदर्शन मान्यवरांतर्फे करण्यात आले. अनधश्रद्धा या विषयावर पथनाट्य इत्यादी उपक्रम घेण्यात आले. स्त्री चे जीवन चार भिंती पुरतेच मर्यादित नसून एकविसाव्या शतकातील स्त्री हीच खरी देशाची शक्ती आहे हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या प्रसंगी उदघाटक म्हणून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती च्या जिल्हा अध्यक्षा डॉक्टर अल्का ठाकरे, अध्यक्ष म्हणून पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या पुष्पा राऊत, प्रमुख अतिथी म्हणून पुरोगामी महिला मंच च्या जिल्हा अध्यक्ष शालिनी देशपांडे, उभारता वक्ता साक्षी मेश्राम, सुलक्षणा गायकवाड, लता उपरकर, माधुरी निंबाळकर, वैशाली दीक्षित, लता मडावी, आदी पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती महिला मंच चिमूर चे वतीने परिश्रम घेण्यात आले.