नागभीड येथील क्रीडा संकुल व जल तरण तलाव धुळखात

28

✒️संजय बागडे(विशेष प्रतिनिधी)मो:-९६८९८६५९५४

नागभीड(दि.22मार्च):-नागभीड येथील क्रीडा संकुल व जल तरण योजनेसाठी चार कोटी रुपये मंजूर करून योजना पूर्णतःवास गेली आहे. मात्र योजनेचे उदघाटन होऊन योजना कोणत्यास विभागास स्थानातरन न झाल्याने धुळ खात पडून आहे. नगर परिषद क्षेत्रात येणारी क्रीडा संकुल व जल तरण तलाव एकाच ठिकाणी होणे गरजेचे होते पण राजकीय लव लेसा पायी क्रीडा संकुल एकीकडे तर जल तरण तलाव दुसरीकडे असल्याने त्याचा फायदा क्रीडा करणाऱ्याला होऊ शकत नाही. करोडो रुपये खर्च करून योजनेचा कल्यानासाठी उपयोग होत नसेल तर त्या योजना कुचकामी ठरत आहेत. आणि शासनाच्या करोडो रुपयाचा चुराडा होत असल्याचे दिसून येते.

योजना पूर्णतःवास गेल्या नंतर ही योजना कल्याणकारी जनतेसाठी खुली करणे गरजेचे होते मात्र हे हस्तातरण न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने देखरेख करणे गरजेचे आहे. पण असे होताना दिसत नाही. यामुळे क्रीडा संकुल रिकामं टेकड्याचे आश्रय स्थान बनले आहे. त्यातच लाखो रुपयाचे यंत्रही धूळ खात पडून तलावतील पाणी गटार गंगा असल्याचे चित्र दिसून येत आहे. क्रीडा संकुल व जल तरण ही योजना स्थानातरित न झाल्यास नागभीड करासाठी दिवा स्वप्न ठरेलं अशी स्थिती दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने या वास्तूची दखल घेऊन जनतेच्या सेवेसाठी खुली करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.