शहीद दिवस निमित्त महान क्रांतिकारकांना एकनिष्ठा फाउंडेशनने वाहिली श्रद्धांजली

34

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगाव(दि.25मार्च):- शहीद दिवस निमित्त एकनिष्ठा फाऊंडेशनच्या वतीने शहीद भगतसिंह, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू या महान क्रांतिकारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्व प्रथम एकनिष्ठा फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी भगतसिंह चौकात एकत्र येऊन शहीद भगत सिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ‘इन्कलाब जिंदाबाद आणि शहीद क्रांतीकारी अमर रहे’च्या घोषणा दिल्या. नंतर सर्व सभासद रक्तदानासाठी सामान्य रुग्णालयात गेले जिथे एकनिष्ठा फाउंडेशनचे अनेक सामाजिक कार्यकर्ते रक्तदान करण्यास तयार होते.

यावेली सुरजभैय्या यादव यांनी उपस्थित रक्त दात्यांना शहीद विर जवान व तसेच रक्तदान बदल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवि मालवंदे हे होते तर प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे, डॉ. निलेश जाधव हे होते यावेली सागर बेटवाल, प्रदीप शमी, सिद्धेश्वर निर्मल, गजानन मच्छरे व रक्तदाते करन गौतम, राहूल जाधव, विवेक बहादरे, मोनिका किलोलीया, अभिषेक वावगे, चेतन कदम, राजेंद्र खंडारे, प्रेम सपकाळ, स्वप्निल धंदाळे, महेश दांडगे, जितेंद्र मच्छरे, अनिल चव्हाण, आदित्य तायडे, रूशिकेश परिहार, उमेश बावस्कर, संजय मेहसरे, ओम जुनगडे, शुभम मोरखडे, सुरज कंडारकर, नयन थेटे, सचिन वानखडे, डिगांबर व-हाडे, मोहन बावस्कर, धनराज कुटे, आकाश सुरदास, अजय मच्छरे, संजय भोसरे, गोपाल चवान, सैय्यद अक्रम, सागर गिरी, पंकज अंबारे, शिवम मानकर, रूतीक खण्डारे, रवि दीपके, अंकुश रक्तदात्यांनी रक्तदान केले पण वेळे अभावी आणि रक्तसाठा पूर्ण झाल्याने अनेक रक्तदात्यांना निराश होऊन परत जावे लागले.

अशाप्रकारे एकनिष्ठा फाऊंडेशनने थोर क्रांतिकारकांना आदरांजली वाहिली आणि तरुणांना प्रेरणा दिली. शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची अवस्था पाहून फाऊंडेशनचे सदस्य आश्चर्यचकित झाले आणि या विशेष दिनी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आली नाही. आपल्या शहीद तरुणांनीच जगाला प्रेरणा दिली आणि त्यांचे विचार आपल्या तरुणांसाठी बळ देणारे आहेत, या विशेष दिवशी विशेष व्यवस्था करणे ही नगर पालिकेची प्रमुख जबाबदारी होती परंतु अशी व्यवस्था केली गेली नाही जी अपेक्षित नव्हती. यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती लखन सारसर प्रसिध्दी पत्राद्वारे कळविण्यात आले.