पाडळी (केसे) येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ग्रामदैवत ह. दावल मलिक बाबा-ह.राजेवली बाबांचा संदल

35

✒️विश्वास मोहिते(पाडळी (केसे)मो:-9763201056

पाडळी (केसे) येथील हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ग्रामदैवत ह.दावल मलिक बाबा – ह.राजेवली बाबांचा संदल 1 एप्रिल रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त……

पाडळी (केसे) तालुका कराड येथील हजरत दावल मलिक बाबा आणि हजरत राजेवली बाबा यांची वार्षिक यात्रा (उरूस)यावर्षी 1 एप्रिल रोजी सुरुवात होत आहे. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत राजेवली आणि हजरत दावल मलिक बाबांचा संदल शनिवारी 1 मार्च 2023 रोजी होत आहे.ह. दावल मलिक बाबा आणि ह. राजेवली बाबा यांचा (उरूस ) ही यात्रा तीन दिवसात विभागली जाते. पहिल्या दिवशी संदल, यामध्ये दर्गा स्वच्छ करून तुरबत वरती चंदनाचा लेप लावला जातो आणि मनोभावी पूजा केली जाते, या यात्रेच्या पहिल्या दिवसाला संदल म्हणून संबोधले जाते. तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पाडळी ( केसे) येथील जुने गावठाण जवळ असणाऱ्या ह. दावल मलिक बाबा आणि ह.राजेवली बाबांच्या दर्गा मध्ये जाऊन मनोभावी पूजा अर्चा केली जाते.

यावेळी गोड पुरणपोळी ( मलिदा ) नैवेद्यही अर्पण केला जातो. यावेळी हजरत राजेवली आणि हजरत दावल मधील बाबांना काही भक्त आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्यास विनंती करतात आणि नवस बोलतात. तर काही भक्तगण गतवर्षी केलेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी दर्गाध्ये हजेरी लावतात. या यात्रेच्या दुसऱ्या दिवसाला उरूस म्हणून संबोधले जाते. तर तिसऱ्या दिवशी गावातून हजरत दावल मलिक आणि हजरत राजेवली बाबांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते यास छबिना म्हणून संबोधले जाते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्साही आणि आनंदी वातावरणात होणार आहे. यात्रेची सुरुवात शनिवारी एक एप्रिल 2023 रोजी संदल असून 2 एप्रिल 2023 रोजी उरूस तर 3 एप्रिल रोजी छबीला होणार आहे. अबाल वृद्धानी यात्रेसाठी तयारी केली असून यात्रा आनंदात पार पडेल अशी आशाही पाडळी (केसे)ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला उरूस
पाडळी (केसे) तालुका कराड येथील हजरत दावलमलीक आणि हजरत राजेवली बाबांच्या उसामध्ये कोणतीही जात आणि धर्म न बाळगता हिंदू मुस्लिम खुल्या मनाने एकत्र येऊन या उसात सहभागी होत असतात.