भाग्यश्री संतोष मडावी हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुडबॉल स्पर्धेसाठी निवड

38

✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चामोर्शी(दि.30मार्च):- केवळरामजी हरडे कॉमर्स महाविद्यालयातील बीकॉम द्वितीय वर्षात शिकणारी मुळची पोटेगाव या गावातील मुलगी भाग्यश्री संतोष मडावी हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुड बॉल स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ वुडबॉल मुलींच्या संघात निवड झाली आहे .राजस्थान येथील जयपूर शहरामध्ये सुरेश ज्ञानविहार विद्यापीठात या स्पर्धा 2 ते 6 एप्रिल यादरम्यान संपन्न होत आहे .करीता गोंडवाना विद्यापीठाचा संघ 31 मार्च रोजी चंद्रपूर वरून जयपूर साठी रवाना झाला आहे .

केवळरामजी हरडे कॉमर्स महाविद्यालयात आणि चामोर्शी ग्रामीण भागात वुडबॉल हा खेळ प्रचलीत करण्याच्या दृष्टीने भाग्यश्री हिची निवड महत्वपूर्ण आहे असे विचार महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ महेश जोशी यांनी व्यक्त केले.

भाग्यश्री मडावी हिच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रदर्शनास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर तसेच यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे,सचिव डॉ स्नेहा हरडे यांनी शुभेच्छा दिल्या असून भाग्यश्री मडावी हिच्या या यशामागे संजय मानकर गडचिरोली ,सचिन रोहणकर चामोर्शी गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ अनिता लोखंडे यांचा सिहाचा वाटा आहे तसेच हिच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला आहे .