प्रभारी ठाणेदाराच्या विरोधात साखळी उपोषण-अवैद्य धंदे बंद करा ; कायमस्वरुपी ठाणेदार मिळण्याची मागणी

32

✒️किशोर राऊत(तालुका प्रतिनिधी,महागाव)

महागांव(दि.3एप्रिल):- पोलीस निरीक्षकाच्या दर्जाचे ठाणे असलेल्या महागाव पोलीस स्टेशनचा कारभार सहायक पोलीस अधिकाऱ्यामार्फत चालविला जात आसल्यामुळे तालुक्यात फोफावलेले अवैध धंदे आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पाहता प्रभारी ठाणेदाराच्या विरोधात सोमवारी (ता.०३) रोजी पासुन प्रभारी ठाणेदाराच्या बदलीसाठी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देवराव हरणे, डॉ.अशोक राऊत आणि किशोर राऊत यांनी दिला आहे. उमरखेड उपविभागाच्या तुलनेत पोलिस स्टेशन महागांव येथे गुन्ह्यांचे अधिक प्रमाण असलेल्या महागाव पोलीस ठाण्याचा प्रभार मागील सहा महिन्यापासून कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयी वरिष्ठ दर्जाचे पोलीस निरीक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत असताना महागाव ठाण्याचे सूत्र सहायक पोलीस निरीक्षक संजय खंडारे यांच्याकडे सोपविण्यात आले असून त्याची प्रभारावरील नियुक्ती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. गुन्ह्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले महागावचे ठाणे पोलीस दफ्तरी संवेदनशील म्हणुन नोंदल्या गेले आहे. किमान पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारीच येथे ठाणे अंमलदार असावा असा नियम आहे. परंतू यापुर्वीचे ठाणेदार विलास चव्हाण सेवानिवृत्त झाल्यानंतर महागाव ठाण्याचा प्रभार सहायक पोलीस निरीक्षक संजय खंडारे यांच्याकडे सोपविण्यात आला. सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून खंडारे प्रभारावर असून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे.

सामाजिक कार्यकर्ता समाधान राऊत याने थेट पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला. तसेच महिला बाबतचे व अन्य गुन्हे अनडिटेक्टेड असूनही संजय खंडारे यांची पाठराखण जिल्हा प्रशासन करीत आहे. महागाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था खालावली असून वरिष्ठ अधिकारी येथे रुजू व्हावा यासाठी आमदार नामदेव ससाने यांच्याकडून तीळमात्र प्रयत्न होत नसल्यामुळे संजय खंडारे यांच्या प्रभारास प्रशासकिय आणि राजकिय वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे. पोलिस स्टेशन हद्दिमध्ये हातभट्टीची दारू आणि गोवंशाची कत्तलीसाठी होणारी वाहतुक यातून महागाव ठाण्याचा दरमहा मोठी रसद मिळत असल्याचा आरोप होत आहे. प्रभारी ठाणेदार पदाचा दुरुपयोग करीत आहेत. वाहतुक शिपाई व्यवहारे यांनी गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांना खुली सुट दिली आहे, तसेच अवैध धंदे बंद करून पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची येथे त्वरित नेमणुक करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

…….

शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली असताना पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड यांना यात सुधारणांसाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. तसेच त्यांच्या मदतीला जिल्हा पोलिस प्रशासनालादेखील विशेष लक्ष घालून महागांव दौरे वाढविणे गरजेचे बनले आहे. अपुरे मनुष्यबळ ही पोलिस प्रशासनासमोरची समस्या असल्याने किमान तालुका पातळीवरील पोलिस ठाण्यात कायमस्वरूपी ठाणेदार नियुक्त करणे गरजेचे आहे.

पोलिस ठाण्यात आधिच अधिकारी, कर्मचारी यांची कमतरता त्यात ठाणेदार पदाचा अतिरीक्त प्रभार त्यामुळे या प्रकारे ठोस पावले वेळीच उचलली तरच तालुक्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था तसेच पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल,अन्यथा दिवसागणिक ही परिस्थिती आणखीन भीषण होऊन पोलिस प्रशासनासमोरची आव्हाने वाढत जाणार आहेत.