सत्यशोधक समाज स्थापना शताब्दी सुवर्ण महोसत्वी वर्ष चालू आहे, तरी समाजाने अनभिज्ञ राहू नये – सत्यशोधक ढोक

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔹फुले एज्युकेशन तर्फे महाराष्ट्र दिनी ४०वा सत्यशोधक विवाह संपन्न 

सिन्नर(दि.2मे):- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि.१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी दु. १ वा. माऊली लॉन्स , गोंदे फाटा ,सिन्नर येथे सत्यशोधक प्रशांत अशोक शेळके , सिन्नर आणि सत्याशोधिका गायत्री विठ्ठल गाडेकर ,संगमनेर यांचा मोफत ४० वा .सत्यशोधक सोहळा संपन्न झाला .

या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी हा विवाह सोहळा पार पडला. येळी शिवडे गावचे सरपंच प्रभाकर हरक आणि उपसरपंच तेजस वाघ यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात आली. तर आई वडील ,मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले गेले. यावेळी अक्षता म्हणून नेहमीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आल्या. तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे ,सत्यशोधक गोविंद माळी आणि दीपक मंडलिक यांनी केले,

याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक प्रतिपादन की महात्मा फुले यांनी १५० वर्षापूर्वी सत्यशोधक समजाची स्थापना केली. .त्या कठीण काळात पंतोजी व शेटजीच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठांना बाहेर काढण्याचे मोठे काम फुले दाम्पत्यांनी केले. अल्पावधीत म्हणजेच दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी शताब्दी सुवर्ण महोसत्वी वर्ष पूर्ण होईल , तरीदेखील आजही सर्व सत्य ,वास्तव कळत असुनही समाज अनभिज्ञच आहे अशी खंत व्यक्त करीत पुढे ढोक म्हणाले की शेळके ,गाडेकर यांचे सारखे कुटंब आयोजक सत्यशोधक गोविंद माळी आणि सोपान जाधव यांच्या मुलामुलींची सत्यशोधक विवाह पाहून कमी शिकलेले असताना देखील त्यांनी कर्मकांड ,अंधश्रद्धा आणि मुहुर्थ याला तिलांजली देऊन महारष्ट्र दिन ह्या शुभ दिनी विवाह केल्याबद्दल फुले एज्युकेशनचे वतीने अभिनदन केले,.सोबत त्यांनी वधू वर यांना मौलिक सल्ला दिला की आपण संसार करीत असताना देखील लवकरच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करावे त्यासाठी स्वतःचे उदाहरण दिले की बीकॉम नंतर २५ वर्षांनी MA मराठी पूर्ण केले तसे आपण करा मुलांना उच्चशिक्षित बनवा .

याप्रसंगी आयोजक सत्यशोधक रत्ना व गोविंद माळी यांनी आपल्या मुला मुलींची ,जावई बंधूचे आणि आज महाराष्ट्र दिनी भाचीचा सत्यशोधक विवाह पार पाडला तसेच विवाह प्रीत्यर्थ अनाथ मुली दत्तक घेऊन व इतरही सामाजिक कार्य केले म्हणून त्यांचा फुले एज्युकेशनचे वतीने ह.भ.प.रत्नाकर पवार महाराज,मानेगांवकर व ह.भ.प.गाडेकर महाराज ,निमोनकर यांचे शुभ हस्ते फुले दांपत्य यांचा एकत्रित अर्ध पुतळा भेट देऊन सन्मान केला. गायत्री व प्रशांत यांचे शुभहस्ते सुरुवातिला सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या पुतल्यास पुष्पहार घालण्यात आले तर छत्रपती शिवाजी , राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यांच्या फोटोला आई वडील ,मामामामी यांचे हस्ते पुष्पहार घालण्यात आले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिन माळी ,मुलाचे चुलते अॅड.केशव शेळके यांनी बहुमोल सहकार्य केले तर गोविंद माळी यांनी आभार मानले.