चौसाळा येथे सिएससी व्हीएलई टेक्नीकल सपोर्ट शाखेचा भव्य शुभारंभ — सचिन सुरवसे

33

✒️नवनाथ आडे((बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.7मे):-गोरगरीब,वंचित,ऊसतोड मजुर व शेतकरी वर्गासह सर्वसामान्य लोकांन पर्यंत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाची माहिती पोहचवण्याकरिता व सर्वसामान्य लोकांना शासन दरात विविध कागदपञे उपलब्ध करून देण्याकरिता बीड तालुक्यातील चौसाळा येथे सिएससी व्हीएलई टेक्नीकल सपोर्टच्या भव्य जिल्हा शाखेचे उदघाटन सोमवार दिनांक 08 मे 2023 रोजी होणार असल्याची माहिती सिएससी ब्लॉकहेड सचिन सुरवसे कुंभारीकर यांनी दिली आहे.

सदरील उदघाटनास बीड जिल्हा प्रतिनिधी दिनेशजी जाधव, संतोष धनलोभे यांच्यासह बीड जिल्हयातील विविध तालुक्यातील प्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिक,पञकार बांधव हे मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी बीड तालुक्यातील व चौसाळा परिसरातील सर्व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सचिन सुरवसे यांनी केले आहे.