गंगाखेड नगरपरिषद अंतर्गत कचरा संकलापोटी मोठया प्रमाणात बोगस बिले काढले जातात जिल्हा कार्यालय परभणी येथे केली तक्रार

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10मे):- नगरपरिषद अंतर्गत कचरा संकलापोटी मोठया प्रमाणात बोगस बिले काढण्यात येत असून यामध्ये मोठ्याप्रमानातं भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार जिल्हा कार्यालय परभणी येथे केली तक्रार करण्यात आली आहे. स्विसतर बातमी गंगाखेड नगरपरिषद कचरा संकलन करण्यासाठी खाजगी एजन्सी ची नेमणूक करण्यात आली असून . या एजन्सी मार्फत शहरातील ओला कचरा व सुका कचरा संकलित करण्यात येतो व तो कचरा डपिंग ग्राउंडवर नेऊन त्याचे वजन करून किती टन कचरा डपिंग ग्राउंड वर झाला.

त्या नुसार त्याचे बील अदा करण्यात येते परंतु या एजंसि मार्फत ओला कचरा व सुका कचरा याचा बोगस वजनाचे रेकॉर्ड तयार करून खोटी बिले सादर करून मोठया प्रमाणात रक्कम काढण्यात येऊन भ्रष्टाचार होत आहे यामध्ये नगरपरिषदे चे कर्मचारी व एजंसि ची मिलीभगत असून या एजन्सी चे डपिंग ग्राऊंडवर वजन करण्यामध्ये हेराफेरी करत मोठया प्रमानातं भ्रष्टाचार होत आहे. गंगाखेड शहरात शासनाने दिलेल्या अनुदानचा मोठया प्रमाणत अपहार होत आहे. कॉन्ट्रकटर पद्धतीने कामगार लावून त्याना कमी प्रमानातं रोजगार देऊन त्याच्याकडून काम करून घेण्यात येत आहे स्वछते साठी काम फक्त कागदावर असून कचरा संकलन खोट्या नोंदी आधारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या मध्ये नगर परिषद चे कर्मचारी सहभागी आहेत.

तरी मा. जिल्हाधिकारी साहेब परभणी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देऊन, खोटी वजन कामाची बिले सादर करून शासनाच्या रक्कमेचा अपहार करणाऱ्या एजन्सी वर कार्यवाही करण्यात यावी तसेच डांपिग ग्राउंड जाऊन तपासणी करावी व किती कचरा संकलित झाला व किती बिले रक्कम अदा करण्यात आली याची माहिती घेऊन या एजन्सी व याएजन्सीला सहकार्य करणाऱ्या नगरपरिषद चे कर्मचारी यांची चौकशी करून निलंबन ची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असी तक्रार *रोहिदास हरिश्चन्द्र लांडगे* (अध्येक्ष, महाराष्ट्र जनक्रांती सेना गंगाखेड )यांनी केली आहे.