उमरखेड येथे वानराच्या चाव्याने अकरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी

30

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10 मे):; शहरातील बोरबन मधील कन्या शाळा जिल्हा परिषद परिसरात दिनांक 9 मे 2023 रोजी एका वानराकडून 11 वर्षीय नामे गौरी राजेश राठोड ह्या मुलीवर वानराने हल्ला करून गंभीर जखमी केली आहे.

व गौरीची प्रकृती चिंतजनक असून त्याच्यावर सरकारी रुग्णालया यवतमाळ मध्ये उपचार सुरू आहे.

सदर उपचाराचा खर्च उमरखेड वनविभागाने देण्यात यावा.
अशी पीडित कुटुंबाची मागणी करत आहेत.

तसेच याच परिसरातील अजून दोन महिन्यांवर या प्रकारचा हल्ला वानराकडून झाला होता.

त्वरित या वानराचा वन विभागाने बंदोबस्त लावावा. अशी वनअधिकारी कार्यालय उमरखेड येथे तक्रार अर्जदार रवींद्र महागडे दिली आहे.