नवयुवक व रमाबाई बौद्ध महिला मंडळतर्फे प्रबोधन, सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम उत्साहात साजरा

32

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.10मे):- येथील बौध्द विहार काॅ.नं.२ नवयुवक बौद्ध मंडळ व रमाबाई बौद्ध महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध पौर्णिमेनिमित्त परित्राण पाठ व सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

तसेच प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.मा.जगदीप खोब्रागडे,कार्यक्रमाचे उद्घाटक आयुनी कविताताई चांदेकर, प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक मा.आसिफराजा शेख,बोधिसत्व मैत्री संस्था व भिमजयंती महोत्सव समिती अध्यक्ष मा.श्याम विस्तारी कुमरवार, जय भीम युथ सर्कल मा.इंजि.आकाश गोरघाटे, सुत्र संचालन व समता सैनिक दलचे अध्यक्ष मा.मनोहर कवाडे या सर्वाचा मार्गदर्शनात कार्यक्रमाची रूपरेषा होती.

सायंकाळी प्रबोधन, सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले.तसेच भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले सर्व बौद्ध बांधव व जेष्ठ नागरिक व इतर परिसरातील एकत्रित होऊन भोजनाचा लाभ घेण्यात आला.

भोजनदान सदस्य कमेटी पवन आगदारी,अशोक (बंडू)रामटेके, दिलीप साठे, प्रशांत वासेकर, रमेश साठे, प्रदीप चांदेकर, अरूण साठे,आशिष वनकर, विलास रामटेके, सोनु भगत, पृथ्वीराज आगदारी,प्रमोद चालखूरे,दिलीप कांबळे व इतर सदस्य आवर्जून उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध वैशाख पोर्णीमा शांततेचा मार्गानी पार पाडला.

यावेळी भीम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्याम कुमरवार, उपाध्यक्ष नंदा कांबळे,सहसचिव सुषमा चांदेकर, कोषाध्यक्ष निळा चिवंडे संघटक अमित बोरकर उपस्थित राहून कार्यक्रमाची उत्साहात शोभा वाढवली.