व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका यांच्या धरणे आंदोलनाला युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी भेट देऊन जाहीर केले समर्थन जाहीर!

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11मे):-व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका यांचे चिमूर तहसील कार्यालयासमोर वृत्तपत्र व पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला *चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे* यांनी भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले.

या वेळेस त्यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य गजाननभाऊ बुटके, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव गौतम पाटील, युवा काँग्रेस कार्यकर्ते जावाभाई शेख उपस्थित होते. पत्रकारांच्या समस्या समजून घेउन जाहीर समर्थन दिल्याबद्दल व्हॉइस आफ मीडियाचे तालुका अध्यक्ष रामदास हेमके व सर्व उपस्थित पत्रकारांनी दिवाकर निकुरे यांचे आभार मानले.