वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागणीसाठी ब्रह्मपुरीत व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे धरणे आंदोलन

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 11 मे ):-माध्यमांकडे लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा पत्रकारांना खेद आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आज दिनांक 11 मे 2023 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले त्यापैकी व्हाईस ऑफ मीडिया मीडिया शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने….

1)पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
2) पत्रकारितेत 5 वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
3) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.
4) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
5) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
6) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.

या प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेसाठी दिनांक 11 मे रोजी 2023 सकाळी 10 ते 1 ते या वेळेत तब्बल तीन तास ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले..

यावेळी ब्रह्मपुरी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुळे सर. नेताजी मेश्राम, दिलीप शिनखेडे, विजय रामटेके, प्राध्यापक श्याम करंबे यांनी पत्रकारांच्या मागणी संदर्भात यावेळी मार्गदर्शन कले. तर धरणे आंदोलन स्थळाला मोजक्या स्वरूपात राजकीय मंडळींनी सुद्धा हजेरी लावली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश राऊत, गिरीधर गुरपुडे, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा नगरसेवक मनोज वट्टे ,शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमृत नखाते, मनसेचे सुरज शेंडे, यांनी भेट देत पत्रकाराच्या समस्या जाणून घेतल्या व पाठिंबा दर्शविला. धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन विनोद दोनाडकर तर आभार प्रशांत डांगे यांनी मानले.

त्यानंतर व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या सर्व पत्रकारांनी न्यायीक मागण्या संदर्भात ब्रह्मपुरीच्या तहसीलदार उषा चौधरी यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फतीने माननीय मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)यांना पाठविण्यात येणार आहे.यावेळी निवेदन देतांना व्हॉइस ऑफ मीडिया शाखा ब्रह्मपुरीचे अध्यक्ष, सचिव,सहसचिव व अन्य पदाधिकाऱ्यासह सर्व सदस्य पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.