कॉंगेस कमिटीच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

28

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:;9823995466

उमरखेड:(दि. 15 मे):-स्थानिक पुसद रोड वरील स्टेट बँकेच्या समोरील राज कार्नर कॉम्प्लेक्स मधे काँगेस कमिटीचे संपर्क कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले सदर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा शहर अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते रिबिन कापुन व नारळ फोडून करण्यात आले.

यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे , तातु देशमुख , दतराव शिंदे , राम देवसरकर, कृष्णा पाटील देवसरकर, बाळासाहेब चंद्रे, प्रेमराव वानखेडे, अजय माहेश्वरी , प्रज्ञा खडसे , आनंदराव कदम , किशोर भवरे , बालय्या दुर्गेमवार , सुधाकर लाहेवार, उत्तमराव कनवाळे , नरवाडे , डॉ विठल चव्हाण, सिद्धार्थ जगताप , विरेंद्र खंदारे, गजानन बेले, अनिल कदम , जितेंद्र पवार , मरसुळकर मॅडम , कविता पोपुलवाड आदी पक्षाच्या सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी लाडू वाटून फटाके फोडण्यात आले.

आगामी काळात होवु घातलेल्या जिनप्रेस , जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगर परिषद, विधानसभा लोकसभा या सारख्या सर्वच निवडणुकी ची तयारी जोमाने करण्याच्या उद्देशाने तसेच तालुक्यातील संपुर्ण भागातील कार्यकर्ते व नागरिकांच्या अडी अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाचा झेंडा तालुकाभर फडकवण्यासाठी संर्पक कार्यालय महत्वाची भुमिका निभावणार आहे.