नवीन संसद भवन ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या

34

(आर पी आय (संविधान) पक्षाच्या डॉ. राजन माकणीकर यांची राष्ट्रपतींना विनंती)

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.24मे):- संसदेत संविधानावर कामकाज चालले जाणार असून संविधान दिनी नवीन संसद भवनाचे उदघाटन व्हावे व संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव देण्यात यावे अशी विनंती पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.*

विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर आपल्या पत्रात म्हणाले की,
देशात हजारो जाती असल्या तरी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या संविधांनामुळे देश जोडून आहे, सर्व जातींना संविधानातून सर्व अधिकार दिले आहेत, देशात समता व बंधुत्वाची पेरणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समता बंधुत्व आणी स्वातंत्रे यावर दृढ विश्वास ठेवणारे नेते होते. त्यांनी सर्व प्रकारच्या भेदभावाविरुद्ध लढा दिला. ते सामाजिक न्याय, लोकशाहीची महानता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एकमेव प्रतीक ठरले. त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना खरी आदरांजली ठरेलं असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

26 नोव्हेंबर 1949 रोजी, संविधान सभेने संविधानाचा मसुदा स्वीकारला, जो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने (बाबासाहेबांनी) तयार केला होता. या स्वरुपात २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला. त्याची आठवण म्हणून 2015 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.

नवीन संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देऊन त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करणे होय.शिवाय 26 नोव्हेंबर रोजी संसद भवन चे उदघाटन करून संविधान दिनाचे महत्व अधिक वाढवणे होय अशी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना केली आहे.