झोपडीत राहणाऱ्या मजुराला दिले 19840 रुपयाचे वीज बिल-तक्रार करूनही चौकशी करण्यास महावितरणची टाळाटाळ

33

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.26मे):-चिमूर येथील इंदिरा नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या मजूरास एकोनविस हजार आठसे चाळीस रुपयाचे विज बिल आल्याने महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला आहे. याबाबत तक्रार दोन वेळा करून सुद्धा महावितरणचे अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

चिमूर येथील इंदिरा नगर येथील रहिवासी अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी या रोजमजुरी करून झोपडीच्या घरात राहणाऱ्या मजुराला एकोणीस हजार आठसे चाळीस रूपयाचे वीज बिल (electricity bill) आले आहे. यांचे टीनाचे घरात लाइट आणि एका पांख्यशिवाय अन्य एकही विद्युत उपकरण नाही.

तरीही महावितरणने 1253 युनिट दाखऊन पाठवलेले वीज बिल पाहून विद्युत ग्राहकास धक्का बसला. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भाने विद्युत ग्राहक अल्ताफ अहेमद अब्बदुल सत्तार कुरेशी यांनी 17एप्रिल 2023 व 8 मे 2023 रोजी मिटर फालटी असून योग्य चौकसी करून तात्काळ मिटर बदलून देण्यासंदर्भात दोन वेळा अर्ज केला. आठ ते दहा दिवस चकरा माराव्या लागल्या परंतु महावितरण अधिकाऱ्यांनी आता पावेतो कोणतीच दखल घेतली नाही.