अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब ! शेतकऱ्यांची तळमळीची मागणी

34

✒️जिवती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जिवती(दि.29मे):-माहे जुलै २०२२ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून माहे जुलै २०२२ अतिवृष्टी निधी जाहीर केली परंतु माहे मे २०२३ तब्बल दहा महिने लोटले असुन सुद्धा जिवती तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आज पर्यंत माहे जुलै २०२२ ची अतिवृष्टीची निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

दररोजच शेतकरी तलाठी कार्यालया ते तहसील कार्यालया चे चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे. “ना शासन ना प्रशासन” कोणीही शेतकऱ्यांचे वाली नाही अशी चर्चा अतिवृष्टीच्या निधी पासून वंचित असलेल्या शेतकरी भावा कडून ऐकण्यात आले आहे.अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब अशी मागणी अतिवृष्टीच्या निधी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे