न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरची नयन ठाकरे तालुक्यात अव्वल

41

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.3जून):-श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षणसंस्था चिमूर द्वारा संचालित न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरची कु.नयन गुणवंत ठाकरे ही ९६.८० टक्के गुण मिळवून चिमूर तालुक्यातून प्रथम आल्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.इयत्ता १० वीचा नुकताच निकाल लागल्यानंतर तालुक्यातून प्रथम कोण? याचा शोध विविध वर्तमानपञांच्या प्रतिनिधींनी घेणे सुरू केले होते.

न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरची कु.नयन ठाकरे ही शाळेतून तर प्रथम अाली.परंतु चिमूर तालुक्यातूनही प्रथम आली.ही विद्यार्थीनी इयत्ता ५ वी पासूनच शाळेतून व वर्गातूनसुद्धा प्रथम क्रमांकाचे गुण मिळवत आहे.अनेक स्पर्धा, परीक्षांमध्ये व सहशालेय उपक्रमात सहभाग घेवून सतत अनेक बक्षिसे व प्रमाणपत्रे तिने मिळविली आहे.सध्या ती नागपूर येथे कोचिंग क्लास करित आहे. शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या चमूने तिच्या घरी भेट देवून तिच्या आईवडीलांना पुष्पगुच्छ देवून व मिठाई भरवून अभिनंदन केलेले आहे.

तिचे वडील चिमूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असुन आई गृहीणी आहेत.कु.नयन ठाकरे ही आपल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय शाळेतील संपूर्ण शिक्षक, आईवडील व वर्गातील मिञमॆञीणींना देते.इयत्ता १० वीच्या निरोप समारंभाप्रसंगी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करताना तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.शाळेतील प्रत्येक शिक्षकांची नावे घेवून ऋणही व्यक्त केले होते.तिच्या भावी जीवनासाठी सर्वांनी अनंत शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत.