म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे वाचनालयाचे काम बंद अवस्थेत – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅॅंथर प्रमोद लोखंडे

36

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज – पॅॅंथर विश्वास मोरे

म्हसवड(दि.4जून):- दलित पँथर सामाजिक संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. बाळासाहेब पडवळ तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.डॉ. घनश्याम भोसले यांचे नेतृत्वाखाली दलित पँथर सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर काम करीत आहेत पॅॅंथर लोखंडे यांनी वेळोवेळी कार्यालयास व म्हसवड नगर परिषदेस निवेदने देवुन म्हसवड नगर परिषद हद्दितील मल्हार नगर येथील वाचनालयाचे बांधकाम म्हसवड नगरपरिषदेने नियोजित/ आखणी केलेल्या जागेत न करता त्या जागेच्या लगत पश्चिम दिशेला असणाऱ्या ६० बाय १०० चौ.फुट. पेक्षा जास्त असणाऱ्या जागेमध्ये वाचनालयाचे बांधकाम सुरु करणेसाठी दि. ६/३/२०२३ रोजी पासुन वेळोवेळी पाठपुरावा करीत असुन सदर कार्यालयाकडून व म्हसवड नगर परिषदेकडुन अद्याप पर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

सदर वाचनालयाचा निधी म्हसवड नगर परिषदेस जमा झालेला असुन केवळ म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे सदर काम बंद अवस्थेत असलेचे दिसुन येत आहे. त्यामुळे सदर वाचनालयाच्या कामाचा निधी परत माघारी जाणेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणुन निधी परत न जाता समाज हिताचे वाचनालयाचे बांधकाम मागणी केलेल्या योग्य जागेत त्वरीत सुरु करावे. तसेच दि. ५/४/२०२३ रोजी मल्हार नगर व बेघर वसाहत येथील नागरिकांनीही वाचनालयाचे बांधकाम पश्चिम दिशेच्या बाजुस सुरु करणेबाबत लेखी निवेदनाव्दारे मागणी केलेली आहे. त्यामुळे आमच्या मागणीच्या पाठपुराव्याला ४ महिने होत आलेले म्हसवड नगर परिषदेने वाचनालयाचे बांधकाम अद्याप पर्यंत सुरु केलेले नाही.

असुन देखील म्हणुन दलित पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने मी मल्हार नगर येथील वाचनालयाचे बांधकाम मागणी केलेल्या योग्य जागेत त्वरीत दि. ३०/५/२०२३ पासुन आपले मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांचे सुरु करणेसाठी कार्यालयासमोर वाचनालयाचे बांधकाम सुरु होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु केलेले आहे. तरी सदरच्या आमरण उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहिल याची नोंद घ्यावी.