हिंदूत्व नाही तर, नेता खतरे में हैं- खासदार संजय राऊत यांचा नितेश राणेंवर निशाणा

34

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4जुन):-हिंदू अजिबात खतरे में नाही. ते स्वतः खतरे में आहेत. हिंदूत्व नाही तर, नेता खतरे में है!, कोणीतरी पोरं येतात आणि हिंदुत्वाबद्दल बोलतात. धूप दाखवल्यामुळे हिंदूत्व धोक्यात येत नाही. तितका हिंदू धर्म कमजोर नाही. धर्मात तेढ निर्माण करून आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे आता त्यांना कळून चुकले आहे. ज्यांनी गोमूत्र शिंपडले ते लोक मूर्ख आहेत, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर थेट निशाण साधला.

त्र्यंबकेश्वरला भेट दिल्यानंतर ते खा. राऊत म्हणाले की, अतिशय शांतता असलेली ही त्र्यंबकेश्वरची वास्तू आहे. मधल्या काळात काही जणांनी ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. मी तेव्हाही येऊ शकलो असतो. पण, शांतता भंग होईल, म्हणून मी आलो नाही. ही काही राजकारणाची जागा नाही. मात्र, या ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला. काही जणांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, गावकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. कोणीतरी पोरं येतात आणि हिंदुत्वाबद्दल बोलतात.

धूप दाखवल्यामुळे हिंदुत्व धोक्यात येत नाही, इतके हिंदुत्व कमजोर नाही, असे ते म्हणाले. राऊत यांच्या मागील काही दिवसांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावर ते म्हणाले की, माझ्या इतके चांगले संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही.

ज्यांनी बेईमानी केली, त्यांना सुरक्षा द्या. मी वन मॅन आर्मी असून मला सुरक्षेची गरज नाही, त्यामुळे मला दिलेली सुरक्षा परत पाठवा, असेही राऊत यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिंदेंच्या नेत्यांविरुद्ध लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचा टाईमपास चालला आहे.. ती भावनाशून्य लोक असून त्यांनी स्वतःच जोडे मारले पाहिजे. त्यांच्या टीकेमुळे खऱ्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही.

शिवशाहीची गद्दारी करुन आता ते शिवाजी महाराजांचा जयजयकार करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा सुरुच आहे. यावर राऊत म्हणाले की, प्रत्येकाला वाटते ४८ जागा निवडून येतील. पण तसे होत नाही काँग्रेसला एकच जागा मिळाली. आम्हाला लोक सोडून गेले, यात नाशिकचा गद्दार सोडून गेला. पण शिवसेना ही जागा जिंकेल.. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू असून, फक्त आम्ही बोलत नाही.