संभाजी ब्रिगेडकडून बल्लारपूर शहरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

38

✒️बल्लारपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बल्लारपूर(दि.8जून):- राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. २००९ पासून संभाजी ब्रिगेड बल्लारपूर शहरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. यावर्षी शहरात ६ जुन रोजी संभाजी ब्रिगेड कडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात सह्याद्री ढोल ताशा व ध्वज पथक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य. दिलीप चौधरी ( सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड चंद्रपूर), विनोद थेरे ( महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर), राजेंद्र गौरकार (अध्यक्ष, मराठा सेवा संघ बल्लारपूर ),माडेकर ( सचिव, मराठा सेवा संघ बल्लारपूर ), प्रा. अनिल वाग्दरकर (सदस्य, मराठा सेवा संघ बल्लारपूर), ॲड. मेघा भाले ( समाजसेविका बल्लारपूर ) यांची उपस्थिती होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख पाहुण्यांना पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यासोबतच जिजाऊ वंदना घेण्यात आली आणि महाराजांची गारद दिली गेली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक चेतन पावडे होते, शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वी करण्याकरीता संकेत चौधरी, निखिल वडस्कर, गणेश मसराम, प्रणय वाटेकर, संकुल झाडे, पवन राजगडे, वैभव गोगुलवार, मोहित अदमाने, रितिक कोंडलेकर, प्रज्वल गौरकार, प्रतिक वाटेकर, नितीन कृष्णापेल्ली, कुणाल क्षीरसागर, मोनिष हजारे, अंकुश पिंपळकर, किर्तीराज मालखेडे, रविकांत येलमुले, कुणाल पटले, रवी चंद्रा आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.