धानासाठी हमीभाव 2040 रुपयांवरून 2183 रुपये

36

🔹मोदी सरकारचा शेतकऱ्यांना प्रति मोठा निर्णय मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला समर्पित सरकार – माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि. 8 जून ):- केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली. सरकारने मूग डाळीचे कमाल समर्थक मूल्य दहा टक्क्यांनी वाढविले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारला प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. डाळींच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन मोदी सरकारने देशातील उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने तूर डाळ, मूग आणि उडीद डाळीच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या हंगामासाठी खरीप पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

ज्यामध्ये तूर डाळीच्या एमएसपी मध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ करून 7000 रुपये पर्यंत प्रती क्विंटल करण्यात आली आहे. उडीद डाळीच्या एमएसपी मध्येही 350 रुपयांनी करण्यात वाढ करून 6950 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. मुगाचा 7755 रुपयांवरून 10.4 टक्क्यांनी वाढवून 8558 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. देशात तूरदाळीचे अधीक उत्पादन व्हावे यासाठी व्यापारांपासून मिलरपर्यंत सरकारकडे तूर डाळीच्या एमएसपी मध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. गेल्या काही महिन्यातून तूर डाळीच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. देशातील तूर डाळीचा खप पूर्ण करण्यासाठी सरकारने 2023- 24 च्या हंगामासाठी देशांतर्गत बाजारात वाढत्या किंमती रोखण्यासाठी अरहर डाळीची आयात केली आहे.

भात (सामान्य) सारख्या इतर खरीप पिकांचा एमएसपी 2040 रुपयांवरून 2183 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहेमक्याचा एमएसपी 1962 रुपये प्रतिक्विंटल वरून 2090 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. कापसाच्या एमएसपी मध्ये नऊ 9 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर भुईमुंगाच्या एमएसपी मध्ये 9 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी वर्ग अतिशय सुखावला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये निश्चितच वाढ होईल. हे सरकार शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार आहे, असा संकेत शेतकऱ्यांमध्ये निश्चितच जाईल आणि शेतकरी सुद्धा या सरकारच्या निर्णयाची स्वागत करून नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले. मोदी सरकार हे शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. असे उद्गार ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी लोकप्रिय आमदार प्रा. अतुल भाऊ देशकर यांनी यावेळी काढले.