राज्यात लव जिहादचे वादळ सुरू असतानाच जावेद शेख ने हिंदू धर्माच्या रिती रिवाजानुसार शुभांगी ठाकरे शी केला आदर्श आंतरधर्मीय विवाह…राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचा पुढाकार

39

✒️चोरटी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोरटी(दि.11जून):-धर्मांध व जातीवादी लोकांच्या दहशतीला भीक न घालता आणि लव जिहाद सारख्या अविचारी घातक संकल्पने पासून दूर राहून ब्रह्मपुरी येथील मुस्लिम धर्मीय चायनीज फूड फास्ट प्रतिष्टीत व्यवसायिक आणि लताबाई तन्हेरवार यांचा दत्तक पुत्र जावेद बशीर शेख 31 याने मौजा मळेघाट, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा येथील हिंदू धर्मीय कुणबी समाजातील B.Sc. चे शिक्षण घेऊन दवाखान्यात नर्सिंग चा जॉब करणाऱ्या सुशिक्षित शुभांगी प्रभाकर ठाकरे 23 हिच्याशी हिंदू रीती रिवाजानुसार अत्यंत साध्या पद्धतीने गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ग्रामसभा भवन चोरटी, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर येथील ग्रामगिता तत्वज्ञान प्रणित सुसंस्कार शिबिराच्या समारोह कार्यक्रमात विवाह केला.

राष्ट्रीय मानव अधिकार संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सारंग दाभेकर, उपाध्यक्ष मोरेश्वर उईके, संघटन मंत्री संतोष भंडारकर, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष आशिष सिंग राजपूत, नागभीड तालुका अध्यक्ष यशवंत निकुरे यांच्या पुढाकाराने आंतरजातीय आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. जावेद आणि शुभांगी यांचे 7 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. प्रेमाचं रूपांतर जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधात परिवर्तीत झाले. धर्म आणि जातीवाद मध्ये गुरफुडलेल्या विचारांच्या लोकांचा विरोध पत्करून जावेद आणि शुभांगीने घेतलेल्या विवाहाच्या निर्णयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिनांक 30 मे रोजी जावेद व शुभांगी चा विवाह लावून देतांना सारंग दाभेकर यांनी गुरुदेव प्रणाली नुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित मंगलाष्टके म्हणून

तसेच उपस्थितांनी त्यांचेवर फुलांचा वर्षाव करून विवाह लावून दिला. व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था चोरटी च्या वतीने जावेद व शुभांगीचा दोघांच्या सहमतीने विवाह संपन्न झाल्याचे विवाह प्रमाणपत्र मोरेश्वर उईके अध्यक्ष श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी तथा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी प्रदान केले. विवाह प्रसंगी निशा मडावी सरपंच ग्रा.पं. चोरटी, डार्वीन कोब्रा संस्थापक अध्यक्ष भारतीय क्रांतिकारी संघटना, दयारामजी कन्नाके, रमेश मेश्राम, देवागुरु, प्रवीण भरणे, कृष्णा खरवडे, सूरज सहारे, निखिल शेंडे, अशोक सरकार, सुशील ढोक, जगदीश तन्हेरवार, साहिल चापले सोनू दुनेदार, खुशाल तन्हेरवार, निशा दाभेकर, जनाबाई जांभूळे, विक्की मसराम, कैलास सोनुले, प्रशिक्षणार्थी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरील आंतरधर्मीय आदर्श विवाह सोहळा राष्ट्रीय मानव अधिकार संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था चोरटी तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, चोरटी च्या पुढाकाराने संपन्न झाला.