प्रब्रह्मानंद मडावी लिखित क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

61

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11जून):-दिनांक १०/०६/२०२३ ला भगवान बिरसा मुंडा शहीद दिनानिमित्त ऊलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर आणि बिरसा बचत गट मुल आयोजित मडावी लिखित क्रांतीयोध्दा जननायक बिरसा मुंडा या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम मा.सा.कन्नमवार जिल्हा मध्यवर्ती बॅक चंद्रपूर येथे पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर नीलकांत कुलसंगे होते. तर पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर अभिलाषा बेहरे गावतुरे यांच्या हस्ते करण्यात आले .या ग्रंथावर भाष्य करताना इशादास भडके, राजेश मडावी, डॉ.रामचंद्र वासेकर तर प्रमुख उपस्थिती चित्रकार भारत सलाम, कवी नरेशकुमार बोरीकर यांची होती. डॉक्टर अभिलाषा बेहेरे गावतुरे आपल्या भाषणात म्हणाल्या की ,”आदिवासींची अस्मिता आणि अस्तित्वाच्या पट उलगडून दाखवणारा हा ग्रंथ आहे. प्रब्रह्मानंद मडावी यांचे संशोधन वृत्ती अत्यंत सुक्ष्म आहे. त्यांनी निर्माण केलेला हा ग्रंथ एकंदर भारतीय समाजाला नवीन दृष्टि दाखवणार आहे. डॉक्टर रामचंद्र वासेकर यांनी पुस्तकात घेतलेल्या नोंदी समाजाला कशा उपयुक्त आहेत यावर भाष्य केले.

राजेश मडावी आपल्या भाषणात म्हणाले की,” बिरसा मुंडा चे कार्य हे मोठे आहे .फुले शाहू आंबेडकर यांच्या परिप्रेशातच बिरसा मुंडा यांचा विचार केला तर आदिवासी समाजाला नव्या क्रांति जाणीवाची ओळख होऊ शकते.” आंबेडकरवादी विचारवंत इशादास भडके सर म्हणाले की ,”बिरसा मुंडा यांच्या जीवनातून क्रांतीचा नवा उद्वेग पाहायला मिळतो .संविधाननिष्ठ माणूस बनवण्यासाठी बिरसा मुंडाच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नीलकांत कुलसंगे म्हणाले की, “आदिवासींनी आपली अस्मिता ओळखावी .बिरसा मुंडाच्या कार्य तेजातून नवी पिढी निर्माण व्हावी.प्रब्रह्मानंद मडावी यांनी क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा या ग्रंथातून एक मोठा विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे .हा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम सर्व वाचकाचे आहे.

याप्रसंगी कवी बोरीकर व डॉ.गावतुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .दुसऱ्या सत्रात कवी संमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पद्मरेखा धनगर होत्या. यामध्ये धनंजय साळवे ,प्रा. संदीप गायकवाड, प्रदीप देशमुख ,विजय वाटेकर, मालती सेमले, अविनाश पोईनकर,गीता देव्हारे, धर्मेंद्र कन्नाके, प्रवीण नाडेकर, अंजुमबानू शेख, सुधाकर कन्नाके, परमानंद जेगठें, किशोर कन्नाके ,सुरेंद्र इंगळे, संतोषकुमार उईके इत्यादी कवींनी सहभाग घेतला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सन्माननीय किशोर कवठे यांनी केले .कार्यक्रमाला बहुसंख्य रसिक वर्ग उपस्थित होता.