झाडीबोली साहित्य मंडळ मूलची कार्यकारिणी गठीत

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11जून):-झाडीबोलीच्या समृद्धीकरिता झाडीबोली टिकवण्याकरिता कार्यरत असलेल्या झाडेबोली साहित्य मंडळ चंद्रपूरच्या वतीने झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूलची २०२३-२०२५ करिता नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.

महिला तालुकाध्यक्ष शशिकलाताई गावतुरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या सभेत मूल शाखेचे अध्यक्ष म्हणून सुखदेव चौथाले, उपाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, तालुका प्रमुख प्रा. रत्नमालाताई भोयर , नामदेव गावतुरे तसेच संघटक म्हणून नागेंद्र नेवारे, परमानंद जेंगटे, रंजित समर्थ, गणेश मांडवकर, नामदेव पीजदुरकर, विजय लाडेकर, गुरुदेव बोरकर यांची निवड करण्यात आली तर महिला कार्यकारणीमध्ये अध्यक्ष म्हणून शशिकलाताई गावतुरे, उपाध्यक्ष स्मिता बांडगे, सचिव वृंदा पगडपल्लीवार तसेच संघटक म्हणून प्रभाताई चौथाले, वंदना वाकडे, मंगला गोंगले, अनुराग गोवर्धन, माधुरी लेनगुरे, शुभांगी शेंडे, सुचिका बुक्कावार, कविता संगोजवार यांची एकमताने निवड करण्यात आली.

झालेल्या सभेमध्ये झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूलच्या पाच वर्षातील कार्याचा लेखाजोखा मांडण्यात आला तसेच तालुका शाखेचा बचत गट काढण्याचे एकमताने ठरविण्यात आले. सभेला सुखदेव चौथाले, लक्ष्मण खोब्रागडे, प्रा. रत्नमालाताई भोयर, शशिकलाताई गावतुरे, नामदेव पिंजदुरकर, वंदना वाकडे, वृंदा पगडपल्लीवार, नामदेव गावतुरे, विजय लाडेकर, प्रभा चौथाले, गुरुदेव बोरकर आदी सदस्य उपस्थित होते