अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या;रिपाईने दिले प्रांताधिकारी यांना निवेदन

33

✒️सागर बगाडे(प्रतिनिधी बारामती)मो:-9766317390

🔹खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी

बारामती(दि.11जून):- नांदेड जिल्ह्यातील बोडार (भीमनगर )या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याचं गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव या युवकाचा जातीयवादी गुंडांनी निर्गुण पणे हत्या केली या संबंधित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे याच अनुषंगाने बारामतीत रिपब्लिकन ऑफ पार्टी इंडिया आठवले गट या गटातील पदाधिकारी जिल्हा व तालुका स्तरावरतील पदाधिकाऱ्यांनी निषेधार्थ संताप व्यक्त करत प्रांत अधिकारी बारामती यांच्यासमोर निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे कि बोनडार गावातील तरुण भीमसैनिक अक्षय भालेराव याचा निर्गुणपणे खून करण्यात आला या खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी व अक्षय भालेराव या युवकाच्या पक्षातून चांगल्यातला चांगला वकील द्यावा आणि ही केस स्वतः सरकारने चालवावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा असं निवेदन बारामती प्रांत सो यांना देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे पदाधिकारी एडवोकेट सुनील शिंदे पश्चिम महाराष्ट्र सचिव तसेच पुणे जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा सोनवणे व बारामती तालुकाध्यक्ष संजयजी वाघमारे उपतालुका अध्यक्ष सुरेश भोसले तसेच तालुका सचिव सागर बगाडे व इतर पदाधिकारी सीमा घोरपडे मयूर मोरे चव्हाण साहेब आदी उपस्थित होते यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ता उपस्थित होता.