भर चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात ;चौघा जणांना अटक

38

✒️सागर बगाडे(प्रतिनिधी बारामती)मो:-9766317390

बारामती(दि.11जून):- बारामती येथील
सराईत गुन्हेगार समीर दादासो चांदगुडे याच्या वाढदिवसानिमित्त बारामती मध्ये सातव चौकात त्याच्या चेल्या ने दहशत निर्माण करण्यासाठी भगर चौकात केक कापण्याचा कार्यक्रम केला यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ही खबर बारामती पोलीसांना समजतात पोलिसांनी चौघे जण ताब्यात घेतले.

राहुल राजेंद्र मदने राहणार प्रगती नगर बारामती जिल्हा पुणे,विकास नानासो चंदनशिवे राहणार मळद बारामती जिल्हा पुणे,अक्षय भीमराव कांबळे राहणार आमराई एसटी स्टँड समोर बारामती जिल्हा पुणे,सागर रमेश पाटोळे राहणार चांदणी चौक कसबा बारामती जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी वरील सर्वांवर भादवि कलम 143 147 149 504 506 तसेच क्रिमिनल ऍक्ट या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशाने गुन्हे पथक अधिकारी यांनी केले